सोमवार, १३ ऑगस्ट, २०१२

मराठी फॅनबुक..मराठी माणसाचे मराठी फेसबूक

नमस्कार
मराठी फॅनबुक वर तुमचे स्वागत!
मराठी फॅनबुक हा मराठी माणसाचा मराठी समुदाय आहे..मराठी माणसाचे मराठी फेसबुक म्हणजे मराठी फॅनबुक.जगभ विखुरलेल्या मराठी माणसांना एकत्र आणण्यासाठी मराठी फॅनबुकची निर्मीती करण्यात आलेली आहे.तुमच्या मित्रपरिवाराला यात सामिल करा आणि मराठीच्या जागतिकरणासाठी तुमचे योगदान द्या.

मराठी मध्ये कसे लिहाल?

मराठी मध्ये लिहिण्यासाठी सध्यास्थिती मधील तुमच्या मनात काय आहे? घालवा आणि इंग्रजी मध्ये मराठी टाइप करून पोस्ट करण्या आधी शब्दा नंतर स्पेस देवून मग कळवा वर टिचकी द्या...मराठी बंद करून इंग्रजी आणि इंग्रजी बंद करून मराठी वापरणायसाठी "ctrl+m" चा वापर करा



गुगल शोध - मी भाग्यवान

गुगल मधून एखाद्या विषयाचा शोध घेत असताना आपण गुगलच्या सर्च बॉक्समध्ये त्यासंबंधीचा एखादा शब्द टाकतो, ज्याला आपण की-वर्ड म्हणतो. की-वर्ड नुसार गुगलचे पान सर्च रिझल्ट्स घेऊन येते. या सर्च रिझल्ट्स मधील वेबसाईट्सची क्रमवारी किंवा वेबसाईटमधील पानाची क्रमवारी ही ती वेबसाईट किंवा पान किती सर्च इंजिन ऑप्टिमाईज्ड आहे!? यावरुन ठरते.

मराठी गुगल’ च्या सर्च बॉक्स खाली आपल्याला दोन पर्याय दिसून येतात, ‘Google शोध’ आणि ‘मी भाग्यवान’. ‘गुगल शोध’ हा पर्याय तर सर्वांना परिचित आहेच, आज आपण पाहणार आहोत ते ‘मी भाग्यवान’ या पर्यायाबाबत. इंग्रजी गुगलमध्ये ही बटणे अनुक्रमे Google Search आणि I'm Feeling Lucky या नावाने ओळखली जातात.

काही वर्षांपूर्वी I'm Feeling Lucky चं ‘मराठी गुगल’ मध्ये मराठी भाषांतर ‘आलिया भोगासी’ अशा अर्थाने केलं गेलं होतं. आणि पुढील बरेच दिवस ते तसंच होतं, त्यात कोणताही बदल करण्यात आला नव्हता. एक दीड वर्षांपूर्वी मात्र त्यात ‘मी भाग्यवान’ असा योग्य बदल करण्यात आला.


गुगल शोध - मी भाग्यवान
‘मी भाग्यवान’ हे बटण कसं काम करतं!? ते मी आता उदाहरणासहीत स्पष्ट करतो. मराठी गुगलच्या सर्च बॉक्स मध्ये ‘फेसबुक’ हा शब्द टाका. त्यानंतर सर्च बॉक्स खालील ‘Google शोध’ या बटणावर क्लिक करण्याऐवजी त्याशेजारील ‘मी भाग्यवान’ या बटणावर क्लिक करा. गुगल तुम्हाला नेहमीप्रमाणे सर्च रिझल्ट्स च्या पानावर घेऊन न जाता, थेट त्याबाबतच्या माहितीचा समावेश असलेल्या वेब पानावर घेऊन जाईल. ‘फेसबुक’ या शब्दाच्या बाबतीत ‘मी भाग्यवान’ हे बटण तुम्हाला 2know.in वेबसाईटच्या ‘फेसबुक पेज तयार करा’ या पानावर घेऊन येईल. म्हणजे सध्या या वेळी, या इथे तर तसंच दिसत आहे. ‘गुगल’ या शब्दाच्या बाबतीतही ‘मी भाग्यवान’ बटण तुम्हाला 2know.in वेबसाईट वरच घेऊन येईल.

थोडक्यात सांगायचं म्हणजे, ‘मी भाग्यवान’ हे बटण तुमचा शोध घेण्याचा वेळ वाचवतं, आणि तुम्हाला थेट इंटरनेटवरील त्या पानावर आणून सोडतं, ज्या पानात तुम्ही सर्च करत असलेल्या शब्दाबाबत अधिकाधिक माहिती आहे. आपला वेळ वाचतो, शोध घेण्याचे कष्ट वाचतात, आपल्याला मनात वाटतं, ‘मी भाग्यवान!’ आणि म्हणूनच तर या बटणाचं नाव आहे, ‘मी भाग्यवान’.

गुगल म्युझिक, मोफत ऑनलाईन गाणी

प्ले बटण
पयुक्त सेवा, ही गुगलची ठळक दोन वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. गुगलच्या भारतीय लॅबने अशीच एक उत्तम सेवा आता आपल्या भेटीसाठी आणली आहे, तिचं नाव आहे, ‘गुगल म्युझिक’. ‘गुगल म्युझिक’ वापरुन आपण नवी, जुनी अशी असंख्य हिंदी गाणी ऑनलाईन ऐकू शकतो. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे आणि त्यासाठी आपल्याला कोणतीही किंमत मोजावी लागणार नाही. वापरकरत्यांना ऑनलाईन मोफत गाणी ऐकता यावीत यासाठी गुगलने in.com, saavn.com आणि saregama.com या वेबसाईट्सची मदत घेतल्याचे दिसून येतंय. अर्थात प्रत्यक्षात in, saavn, saregama या वेबसाईट्सवर जाऊनदेखील आपण ऑनलाईन संगिताचा आनंद घेऊ शकतो. पण गुगलचा जाहिरातींशिवाय असलेला साधा-सोपा इंटरफेसच ऑनलाईन गाणी ऐकण्याबाबत उजवा वाटतो.

‘गुगल म्युझिक’ या सेवेचा आनंद घेण्यासाठी आपण या इथे क्लिक करु शकता. वर सांगितल्याप्रमाणे ‘गुगल म्युझिक’ हे गुगलच्या भारतीय लॅबचे उत्पादन आहे. गुगल म्युझिकच्या पानावर गेल्यानंतर आपल्याला त्या तिथे एक सर्च बॉक्स दिसून येईल. तिथे आपण कलाकाराचे नाव, सिनेमाचे नाव, अल्बमचे नाव किंवा प्रत्यक्षात एखाद्या गाण्याचे नाव टाकून हव्या त्या आवडीच्या गाण्याचा शोध घेऊ शकतो. सर्च बॉक्सच्या खाली अगदी अलिकडच्या काळातील सिनेमांची गाणी ऐकण्याबाबतची सोय करुन देण्यात आली आहे.
‘गुगल म्युझिक’च्या सर्च बॉक्समधून गाण्याशी संबंधीत एखाद्या शब्दाचा शोध घेतल्यानंतर पुढच्या पानावर आपल्याला शोध परिणाम दिसून येतील. यावेळी आपण त्या पानाच्या डाव्या बाजूला साईडबारमध्ये पाहिल्यास आपल्याला काळानुरुप गाणे निवडण्याचे स्वातंत्र्य दिसून येईल. उदाहरणार्थ, मी सर्च बॉक्स मध्ये ‘hum tum’ असं टाईप करुन शोध घेतल्यानंतर येणारं पान हे अनेक शोध परिणाम घेऊन आलं. त्यात अगदी जुन्या काळापासून ते आजपर्यंतच्या गाण्यांचा समावेश होता. आता मी डाव्या बाजूच्या साईडबारमधून 90's वर क्लिक केलं, अशावेळी शोध परिणाम हे 9० च्या दशकातील गाण्यापर्यंतच सिमित राहिले. अगदी असंच old, 70's, 80's, 2000's, This year या पर्यायांचा वापर करुन आपण गाण्यांचे शोध परिणाम ठराविक कालखंडामध्ये सिमित करु शकतो. त्यामुळे आपल्याला आपल्या आवडीचं गाणं शोधणं हे अधिक सोपं जाणार आहे. काही लोकांना ठराविक कालखंडातील (कदाचीत ते प्रेमात पडले त्या काळातील) गाणी ऐकणंच जास्त पसंद असतं. अशा लोकांनादेखील याचा चांगला उपयोग होऊ शकतो.


‘गुगल म्युझिक’चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपण जेंव्हा एखाद्या गाण्याचे ‘प्ले बटण’ दाबतो, त्यावेळी एक लहानशी नवीन विंडो ओपन होते. त्या विंडोमध्ये ते गाणे सुरु होण्यासाठी, ऐकू येण्यासाठी आवश्यक असा ‘म्युझिक प्लेअर’ असतो. या म्युझिक प्लेअरवरील बटणांच्या सहाय्याने आपण गाण्याचा आवाज कमी-जास्त करु शकतो अथवा ते गाणे पुढे-मागे ढकलू शकतो. हे गाणे नवीन विंडोत सुरु असल्याने, आपण आपल्या मुख्य ब्राऊजरमध्ये गाण्याचा आनंद घेत घेत विनाअडथळा आपले नेट सर्फिंगचे कामही सुरु ठेऊ शकतो. एकंदरीत सांगायचं झालं, तर ‘गुगल म्युझिक’ ही साधी-सोपी मोफत ऑनलाईन हिंदी गाण्यांचा आनंद देणारी सुविधा आहे

शनिवार, २८ जुलै, २०१२

जाहिरात क्षेत्रात पैसे कसे कामवाल?


मित्रानो तुम्हाला माहीतच आहे कि जाहिरात क्षेत्रात किती पैसा हा एखादी वस्तूची जाहिरात करण्यासाठी खर्च केला जातो. एखादा हिंदी सिनेमाचा कलाकार जेवढे पैसे संपूर्ण सिनेमा करण्यासाठी घेतो तेवढे किंवा कधी कधी त्यापेक्षा जास्त पैसे २ ते ३ मिनिटाची जाहिरात करण्यासाठी घेतो. हे झाले टीवी किंवा मेडीया मधील जाहिरातीतील. पण ओंनलाईन जाहिरातीचे काय यावर तर टीवी पेक्षा कदाचित जास्तच पैसे खर्च केले जातात कारण गुगल सारख्या कंपन्या यामधूनच रोज करोडो डॉलर कमवीत असतात.
तुम्ही पण ओनलाईन जाहिरातीच्या माध्यमातून पैसे कमवू शकता. यासाठी तुम्ही ऑनलाइनलेख लिहावे. सुंदर असे व्हीडीओ युटूबवर अपलोड करून किंवा ब्लॉग, वेबसाईट तयार करून त्यावर जाहिराती देऊन पैसे कमवू शकता.

रविवार, १५ जुलै, २०१२

मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा


पल्या मोबाईलवर इतर वेळी अनेक जाहिरातींचे sms येत असतात. काही वेळा तसे कॉलही नको असताना आपल्याला उचलावे लागतात. आणि त्याबदल्यात आपल्याला काय मिळतं!? काहीही नाही! तर केवळ मनस्ताप! आता समजा असा मनस्ताप मिळण्याऐवजी आपल्याला त्याबदल्यात पैसे मिळणार असतील तर!? नक्कीच! अशावेळी आपला जाहिरातदारांकडे पाहण्याचा दॄष्टिकोण बदलून जाईल. शिवाय ज्या जाहिरातींच्या बदल्यात आपल्याला पैसे मिळणार आहेत, त्या सर्व जाहिराती आपल्या आवडीला आणि आपल्या वेळेला अनुसरुन अशाच असतील.



तर आपल्या मोबाईलवर sms वाचण्यासाठी पैसे कसे मिळवयाचे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तुम्हाला सांगता सांगता मीही माझ्या घरातला एक मोबाईल mginger.com या वेबसाईटवर मोफत रजिस्टर करणार आहे. त्यामुळे प्रत्येक पायरी व्यवस्थित सांगणं मला सोपं जाईल. कारण बरेच लोक रजिस्ट्रेशनची अर्धवट प्रक्रियाच पूर्ण करतात!



साईन अप बटण असे दिसेल

१. या इथून आपण mginger या वेबसाईटवर जाऊ शकतो.

२. त्यानंतर आलेल्या पानावर SignUp for free नावाचं बटण आहे. त्यावर मी क्लिक केलं.
३. SignUp चा रजिस्ट्रेशन फॉर्म आला आहे. तिथे मी माझं नाव, आडनाव आणि ई मेल पत्ता टाकत आहे.
४. त्यानंतर ज्या मोबाईल नंबरवर मला जाहिरातींचे sms हवे आहेत, तो मोबाईल नंबर मी देत आहे.
५. आता Gender, Marital Status आणि Birthday टाका.
६. एखादं हवं असेल ते युजरनेम (टोपणनाव) निवडापासवर्ड निवडा . दिलेल्या पासवर्डची पुन्हा एकदा खात्री करा. आणि मग शेवटी दिलेल्या Create My Account या बटणावर क्लिक करा.
७. त्यानंतर तुम्ही Upgrade या पानावर पोहचलेले असाल. आणि तुमच्या मोबाईलवर ‘Message’ कडून एक sms देखील आला असेल. आला नसेल तर थोडी वाट पहा. तो लगेच तुमच्या मोबाईलवर येईल. मेसेजचं नंतर बघू! तोपर्यंत आपण Upgrade हे पान भरायला सुरुवात करुयात.
८. ‘ज्याच्या नावानं mginger ने आपण कमावलेले पैसे पाठवावेत असं तुम्हाला वाटतं’, त्याचं नाव त्या तिथे टाका. शक्यतो तुमचंच नाव टाका.
९. पत्ता द्या. त्यानंतर त्याखाली विचारलेली माहिती जमेल तेव्हढी भरत रहा. आणि मग शेवटी Save या पर्यायावर क्लिक करा.
१०. आता तुम्ही Invite या पानावर आला असाल. एक गोष्ट लक्षात घ्या की, तुमच्या मोबाईलवर प्राप्त होणार्‍या प्रत्येक sms साठी तुम्हाला २० पैसे मिळणार आहेत. तुम्ही बोलावल्यानंतर तुमच्या नेटवर्क मध्ये सामिल झालेल्या मित्राच्या मोबाईलवर sms आल्यावर दरवेळी तुम्हाला त्यासाठी १० पैसे मिळणार आहेत. इतकंच नाही तर तुमच्या नेटवर्क मधील मित्राच्या नेटवर्क मधे जितके काही मित्र असतील त्या प्रत्येकाच्या मोबाईलवर sms आल्यावर तुम्हाला त्याचे ५ पैसे मिळतील. आणि तुम्ही तुमच्या नेटवर्क मध्ये असे कितीही मित्र जोडू शकता. त्यासाठी Invite हे पान तुम्हाला मदत करेल. तुम्ही यशस्वीरित्या बोलावलेल्या प्रत्येक मित्रामागे तुम्हाला २रु. मिळतील. म्हणजे यासाठी तुमच्या मित्राने त्याचा फोन व्हेरिफाय करणं आवश्यक आहे. तुम्ही दिलेला फोन नंबर हा तुमचाच कशावरुन!? त्यासाठी तुम्हालाही तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय करावा लागणार आहे.
११. काही मित्रांना माझ्या नेटवर्कमध्ये सामिल होण्याचे आमंत्रण दिल्यानंतर आता मी माझा मोबाईल व्हेरिफाय करत आहे. त्यासाठी माझ्या मोबाईलवर स्टेप ७ मध्ये सांगितल्याप्रमाणे जो sms आला होता, त्या sms मध्ये सांगितल्यानुसार मी वागलो. आलेला sms मी दिलेल्या नंबरला फॉरवर्ड केला. आणि माझा मोबाईल व्हेरिफाय झाला! (कदाचीत +919945999459 हा तो नंबर असेल, एकदा आपला sms वाचून हा नंबर पडताळून पहा. पण शेवटी तुमच्या sms मध्ये दिलेल्या नंबरवर तुम्हाला आलेला sms जसाच्या तसा फॉरवर्ड करायचा आहे.) 
१२. स्टेप ३ मध्ये दिलेला ई-मेल पत्ताही मी आता माझ्या ई-मेल अकाऊंटवर जाऊन व्हेरिफाय करत आहे. दिलेल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर माझा ई-मेल पत्ता व्हेरिफाय झाला आहे. (तुम्हाला जर ईमेल पत्ता व्हेरिफाय करताना काही अडचण आली, तर काही काळजी करु नका. ते तितकंसं आवश्यक नाही, पण केलेलं बरं! फोन नंबर व्हेरिफाय करणं मात्र आवश्यक आहेच आहे!)
१३. माझा फोन नंबर व्हेरिफाय केल्याच्या मोबदल्यात मला माझ्या mginger अकाऊंट मध्ये ३रु. मिळाले आहेत. तर email address व्हेरिफाय करण्याच्या मोबदल्यात मला १रु. मिळाला आहे. 
१४. mginger वापरुन पैसे कमवायला मी आता सुरुवात केली आहे.


पैसे कमवा

तुम्हीही असे पैसे कमवू शकता. तुमचं नेटवर्क वाढवत जा आणि मग तुमचे पैसेही वाढत जातील. एकदा हे सारं केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर sms येत जातील, तुमच्या खात्यात पैसे जमा होत जातील. mginger या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या खात्यात किती पैसे झाले आहेत हे कधिही तपासून पाहू शकता. एकदा तुमच्या खात्यात ३०० रु. जमा झाले, की ते तुमच्या नावचा चेक, तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पाठवून देतील. अशाप्रकारे कोणतंही अतिरिक्त काम न करता तुम्ही पैसे कमवू शकता. त्यासाठी mginger हा आपल्यासाठी एक चांगला पर्याय आहे

शनिवार, ७ जुलै, २०१२

इंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवणे


री बसून इंटरनेट मार्फत पैसे कसे कमवता येतील? हा इंटरनेटवर सर्रास विचारला जाणारा प्रश्न आहे. घरी बसून पैसे कमवणं हा विचार देखील खूप आकर्षक आहे. पण एखादी गोष्ट जमणार्‍याला जमते, तर न जमणार्‍याला अथक परिश्रम करुनही जमत नाही. याचा अर्थ असा नाही की, न जमणारा कमी आहे. त्याने यावरुन इतकंच लक्षात घ्यायला हवं की, या जगात आपण कोणत्यातरी दुसर्‍या कामासाठी बनलो आहोत, जे इतर फारच कमी लोक करु शकतात.

जून २०१२ च्या या संपूर्ण महिन्यामध्ये आपण ऑनलाईन पैसे कमवण्याचे विवध मार्ग पाहणार आहोत. मी आपल्याला केवळ निरनिराळ्या दिशा दाखवण्याचे काम करेन, आपण हमखास श्रीमंत व्हाल अशी खात्री मात्र मी देऊ शकत नाही. आपण हे काम किती हुशाराने, झोकून देऊन, आणि संयम ठेवून कराल यावर आपलं यश आवलंबून आहे. ऑनलाईन पैसे कमवणं हे काम सोपं नाही. त्यासाठी खूप सारे कष्ट लागतात आणि त्याहून अधिक संयम लागतो. सुरुवातीच्या अनेक महिन्यांमध्ये आपली ० (नाममात्र) रुपयांवर अनेक तास काम करण्याची तयारी हवी. त्यामुळे आपली आवड या कामामध्ये असणं फार महत्त्वाचं आहे.

इंटरनेटवरुन ऑनालाईन पैसे कमवणं
पैसे कमवणे हे खरं तर दृष्टिकोनावर अवलंबून आहे. आपल्या विचारात जर सहजपणा असेल, तर खूप सारे पैसे कमवणं हे तसं फार काही अवघड काम नाही. पण अनेकदा निराशा आपल्यावर अधिक प्रभावी ठरते आणि अशावेळी संपूर्ण गरजेपेक्षा थोडेसे अधिक पैसे कमवणं हे फारच कठीण काम होऊन बसतं. यात नेकमी आपली गरज किती? हे ओळखणं महत्त्वाचं आहे आणि ते देखील शेवटी प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे.

पैसे कमवण्याचे जे विविध मार्ग मी सांगणार आहे, ते सर्व मार्ग मी स्वतः आजमावून पाहिले आहेत. पण याचा अर्थ असा नाहीये की मी स्वतः त्यात यशस्वी झालो आहे. पण तरी देखील ऑनलाईन पैसे कमवण्याच्या सर्व दिशा मी आपल्याला दाखवून देणार आहे. कारण मला एखादी गोष्ट जमली नाही, याचा अर्थ असा नाहीये की ती गोष्ट आपल्याला देखील जमणार नाही.

मी माझं करिअर या क्षेत्रात निर्माण केलं आहे आणि आपणही नक्कीच इंटरनेटवरुन ऑनलाईन पैसे कमवू शकाल. आपण जर नोकरी करत असाल आणि अतिरिक्त कमाई अशा दृष्टिने सहजतेने आपण हे काम करत गेलात, तर आपण नक्कीच निराश होणार नाही.

‘ऑनलाईन पैसे कमवणे’ ही लेखमाला मी या पानावर एकत्र संकलीत करेन, जेणेकरुन नंतर आपणास ही सर्व माहिती एकत्रितपणे मिळवणं सोपं जाईल. मी उद्यापासून ऑनलाईन पैसे कमवण्यासंदर्भात लेख लिहिण्यास सुरुवात करेन. त्या सर्व लेखांचे दुवे मी नंतर या इथे खाली देईन.


बुधवार, २९ फेब्रुवारी, २०१२

पैसा कसा मिळवावा?

पैसा म्हणजे काय?
* पैसा ही वस्तू व्यवहाराचे सर्वात सक्षम साधन आहे. वस्तूंच्या अदलाबदलीने होणाऱ्या व्यवहारांमधील प्रचंड गैरसोय पैशाच्या वापराने दूर झाली.
* वस्तू आणि सेवा या दोन्हींचे मूल्य पैशात करता येत असल्यामुळे पैसा हे माध्यम सर्वच व्यवहारांना उपयुक्त आहे.
* पैसा हे संपत्तीचे अर्थात श्रीमंतीचे मोजमाप आहे.

पैसा कसा मिळवावा?
* "जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, उदास विचारे वेच करी', ही तुकोबांची उक्ती डोळ्यासमोर ठेवून पैसा मिळवावा आणि खर्च करावा. धन मिळवण्याच्या मार्गाच्या भलेपणाविषयी थोडी जरी शंका असेल, तरी तो मार्ग त्याज्य समजावा.
* प्रामाणिकपणे कोणाचीही फसवणूक न करता आणि उचित व्यवहारांचा अवलंब करून पैसा मिळवावा.
* "पैसा म्हणजेच सर्व काही आहे,' हे मानणारे पैशासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. मिळविलेल्या पैशाचा आनंद घेता येईल इतकाच पैसा मिळवावा.

अधिक पैसा म्हणजे अधिक चांगले जगणे, हे बरोबर आहे का? ते कसे साध्य करावे?
* पैसा सुज्ञ माणसाच्या फक्त मनात असावा; हृदयात नसावा.
* चांगले जगणे म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण होऊन शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यांचा लाभ मिळणे. यासाठी किती पैसा हवा, हे त्या व्यक्तीच्या मनोभूमिकेवर अवलंबून असते.
* सुखी आयुष्य जगायला एका मर्यादेपर्यंतच पैसा आवश्‍यक असतो. त्यापेक्षा अधिक मिळालेला पैसा, ते परतफेड करू शकणार नाही, अशांसाठी खर्च केला तर त्याचे समाधान शब्दातीत आहे.
* "चंगळवाद वाईट' असे म्हणताना चंगळवादाची व्याख्या कालमानानुसार बदलत जाते, हे लक्षात ठेवले पाहिजे. कालची चैनीची वस्तू आज गरजेची बनते. पूर्वी घरातील सर्वांसाठी एकच फोन असे. आता लहान मुलासह प्रत्येकाकरिता तो आवश्‍यक बनला आहे. पण नवीन मॉडेलच आपल्याकडे हवे, हा अट्टहास चुकीचा आहे.
* वाजवी अपेक्षा बाळगून आणि अनावश्‍यक स्पर्धा टाळून आयुष्य सुखी व्हायला मदत होईल.

कौटुंबिक अर्थसंकल्प कसा करावा?
* आर्थिक नियोजन सर्वांसाठी आवश्‍यक आहे आणि अर्थसंकल्प हे त्याचे फलित. असे अंदाजपत्रक तयार करण्यापूर्वी घरातील सर्वांनी एकत्र बसून विचारविनिमय करून समान भूमिका निश्‍चित करणे आवश्‍यक.
* "आपल्याला कोठे जायचे आहे' ते आधी ठरवावे. म्हणजेच साधारणपणे पुढच्या 10-15 वर्षांची योजना तयार करावी- ज्यात ठळक बाबींचा समावेश असेल. तसे केले तर म्युच्युअल फंडातील "एसआयपी'सारखी नियमित गुंतवणूक आजच चालू करता येते.
* अर्थसंकल्पात घरातील सर्वांच्या इच्छा-आकांक्षाचे प्रतिबिंब दिसणे अपेक्षित आहे आणि त्या पूर्ण करण्याकरता कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग आवश्‍यक आहे. त्यामुळे प्रत्येक सदस्याची बांधिलकी राहते.
* परिस्थितीनुसार अर्थसंकल्प बदलावा लागेल, याचेही भान ठेवले पाहिजे. जमा आणि खर्च या दोन्हींचा विचार करताना, जमा रक्कम अपेक्षेपेक्षा कमी धरावी आणि खर्च मात्र जास्त होईल, असे समजावे.
* आवश्‍यक त्याकरिता व आवश्‍यक तेवढेच कर्ज घ्यावे, जे व्यवस्थितरीत्या नंतर फेडता येईल.

पंधरा हजार रुपयांत घर कसे चालवावे?
* तुम्ही ज्यावर खर्च करता, यावरून तुमच्या आयुष्यात महत्त्व कशाला आहे, ते कळते.
* आपला जमा आणि खर्च किती होतो, याचा अनेक जणांना पत्ताच नसतो. 80ः20 तत्त्वाचा उपयोग करून महत्त्वाचे खर्च लिहून ठेवावेत. सर्वात जास्त रकमेपासून खर्च कमी करायला सुरवात करावी.
* रु. 13 हजार एवढ्याच रकमेचा खर्च करता येईल, हे आधीच पक्के ठरवावे. महिना किमान दोन हजार रुपयांची बचत किंवा गुंतवणूक करता आली पाहिजे. प्राधान्यानुसार खर्च करावा.

महागाईवर मात कशी करावी?
* आर्थिक नियोजनात दोन वर्षांनंतरच्या खर्चाच्या बाबी निश्‍चित करताना त्यामध्ये वाढत्या महागाईचा विचार केला पाहिजे.
* जमा-खर्चाची मिळवणी करताना काटकसर करण्यावरच भर दिला जातो. पण उत्पन्न कसे वाढेल, याकडेही लक्ष द्यायला पाहिजे. नोकरी करणाऱ्याला आपली क्षमता वाढवून बढती किंवा अधिक पगाराची दुसरी नोकरी मिळवता येते, तर व्यावसायिकाला जास्त कार्यक्षमता दाखवून अधिक फायदा मिळवता येईल. चांगली गुंतवणूक करूनही पैसा वाढवून महागाईवर मात करता येते.
* खर्च कमी करण्याची किंवा उत्पन्न वाढवण्याची जबाबदारी घरातील सर्वांची आहे, फक्त गृहिणीची नाही. आवश्‍यकतेनुसार प्रत्येकानेच खर्चाला मुरड घातली पाहिजे किंवा अधिक पैसे मिळविण्याचा मार्ग शोधला पाहिजे. उदा.- सुटीच्या दिवशी काम करणे, शिकवण्या करणे किंवा छोटा व्यवसाय करणे, आदी.

बचतीचे महत्त्व आणि तिचे नियोजन कसे करावे?
* वयाच्या पंचविशीतच बऱ्यापैकी पैसा हाती खेळू लागल्यानंतर मौजमजेवर अधिक पैसे खर्च होण्याची शक्‍यता जास्त. त्यामुळे याच वयापासून बचतीची सवय लागणे आवश्‍यक. 
* दरमहा मिळणाऱ्या उत्पन्नातून काही रक्कम कटाक्षाने बाजूला ठेवण्याची सवय लावून घ्यावी. कारण अडीअडचणीच्या वेळी हीच रक्कम उपयोगी पडते.
* निव्वळ काही पैसे बाजूला ठेवणे किंवा बचत करणे किंवा बॅंकेत अथवा पोस्टाच्या योजनेत गुंतवणूक करणे म्हणजे आर्थिक नियोजन नाही.
* आधी बचतीची सवय लागल्यास पुढे गुंतवणुकीची कास धरणे सोपे जाते. कारण बचतीनंतर येते ती गुंतवणूक. 
* बचतीतून उभे राहणारे पैसे तुमची तात्कालिक गरज भागवू शकतात, तर गुंतवणुकीच्या माध्यमातून दीर्घ पल्ल्याची उद्दिष्टे साध्य करता येतात.
* वाढत जाणारी महागाई, त्यायोगे वाढणारा वैद्यकीय खर्च, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न, कालांतराने गरजेची वाटू लागणारी निवृत्तीनंतरची तरतूद या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून कमावत्या वयातच आर्थिक नियोजन करावे.
* आर्थिक नियोजनातील पहिली पायरी म्हणजे आपली आर्थिक उद्दिष्ट निश्‍चित करणे.
* बचतीची सवय, गुंतवणुकीचा मनोनिग्रह, जोखीम घेण्याची मानसिकता आणि तयारी यावरच उद्दिष्टपूर्ती अवलंबून.
* गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या गरजेप्रमाणे गुंतवणूक प्रकारांचा आराखडा तयार केला पाहिजे. 
* बाजारातील विविध गुंतवणूक प्रकारांचा विचार करून आपल्या उद्दिष्टाला साजेशा गुंतवणूक प्रकारांची निवड करणे आणि त्यांचे प्रमाण निश्‍चित करणे महत्त्वाचे.
* गुंतवणुकीच्या विविध प्रकारांमध्ये 1) बॅंकेतील मुदतठेव योजना (एफ.डी.), 2) पोस्टाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या अल्पबचत योजना (नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट अर्थात एन.एस.सी., किसान विकास पत्र, मंथली इन्कम स्कीम अर्थात एम.आय.एस., रिकरिंग ठेव योजना (आर.डी.) वगैरे), 3) निवडक राष्ट्रीयीकृत बॅंका तसेच पोस्टात राबविली जाणारी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पी.पी.एफ.) योजना, 4) सरकारी रोखे किंवा बॉंड्‌स, 5) आयुर्विमा आणि युलिप, 6) पेन्शन प्लॅन्स, 7) म्युच्युअल फंड, 8) शेअर बाजार, 9) स्थावर मालमत्ता (घर, जमीन वगैरे), 10) सोने-चांदी यांचा प्रामुख्याने समावेश.
* आपले वय आणि त्याच्या प्रमाणात जोखीम स्वीकारण्याची क्षमता यावर गुंतवणुकीचे प्रमाण ठरवावे. जर तुम्ही 40 वर्षांचे असाल तर 40 टक्के गुंतवणूक सुरक्षित व निश्‍चित उत्पन्न देणाऱ्या ठेव योजनांत व 60 टक्के शेअर बाजार किंवा त्याच्याशी जोडलेल्या गुंतवणूक साधनांत करणे योग्य. 
* जसे वय वाढत जाते तसे जोखीमपूर्ण गुंतवणुकीचे प्रमाण कमी करत जाणे श्रेयस्कर.

आर्थिक हिशेबाच्या, गुंतवणुकीच्या नोंदी कशा ठेवाव्यात?
* "टु ब्रेक रेकॉर्ड, कीप रेकॉर्ड' ही उक्ती आर्थिक नियोजनातही लक्षात ठेवावी.
* आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य होत आहे किंवा झाले आहे, हे लक्षात येण्यासाठी आर्थिक गुंतवणुकीच्या नोंदी ठेवणे आवश्‍यक आहे.
* विमा, मुदतठेवी, पोस्टातील गुंतवणूक, शेअर्स, म्युच्युअल फंड, बॉंड्‌स आदी प्रकारांतील गुंतवणुकीचे तपशील एका वहीत टिपून ठेवावेत. शक्‍य असेल तर संगणकात "एक्‍सेल शीट'मध्ये मांडणी करून "सेव्ह' करून ठेवावे. 
* पॉलिसी क्रमांक, खाते क्रमांक, ठेव पावती क्रमांक, फोलिओ नंबर, डिमॅट नंबर या महत्त्वाच्या नोंदीबरोबरच मुदतपूर्तीची तारीख, परतीची रक्कम आदींसाठी रकाने करून ते वेळच्या वेळी भरावेत. 
* यादी करताना मुदतपूर्ती म्हणजेच पैसे परत कधी मिळणार आहेत, त्या तारखेला प्राधान्य द्यावे. म्हणजे एक-एक गुंतवणूक प्रकार संपला आणि त्या बदल्यात पुन्हा नव्याने गुंतवणूक केल्यास त्याचा अग्रक्रम बदलावा. अशा यादीमुळे तुमची "आर्थिक तब्येत' एका दृष्टिक्षेपात कळू शकेल.

अपुरी मिळकत असेल तर जोड काय देता येईल? कशी? अधिक पैसा मिळविण्याच्या स्वतःच्या क्षमतांचा शोध कसा घ्यावा?
* नोकरी किंवा व्यवसायातून मिळणारी रक्कम आपला घरसंसार चालवायला पुरेशी ठरत नसेल, तर त्याला आपल्या क्षमतेनुसार जोड देता येऊ शकते.
* अशी जोड देण्यापूर्वी आपल्या हाताशी असणारा वेळ, पात्रता, मिळणारे उत्पन्न यांचा प्रामुख्याने विचार करावा.
* एखाद्या किराणा दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीला पहाटे किंवा सकाळच्या वेळेत घरोघरी वृत्तपत्रे वितरित करणे, दुधाच्या पिशव्या नेऊन देणे आदी कामे करून आपल्या मिळकतीला जोड देता येऊ शकते. 
* आजच्या काळात प्रत्येकाला नोकरी मिळणे सहजशक्‍य नाही. मात्र आपल्यातील कलागुणांना वाव देऊनदेखील चार पैसे मिळविता येऊ शकतात. उदा.- विद्यार्थ्यांच्या शिकवण्या घेणे, वाद्य वाजवायला शिकवणे, क्रीडा प्रशिक्षण देणे.

जोडधंद्याचे धाडस कोणी करावे? ते कसे पेलावे?
* धाडस हा श्रेष्ठ गुण आहे; पण आपल्याला काय करायचे आहे, काय हवे आहे, याचा निर्णय आधी करायला हवा. 
* धाडसाच्या शेवटी यश हवे असेल, तर नीट तयारी करून जोखीम घेणे जरुरीचे आहे. 
* धाडस करताना प्रसंगी जायबंदी होण्याची किंवा इतरांची सहानुभूती न मिळता जखमी होण्याची तयारी हवी. 

रविवार, २६ फेब्रुवारी, २०१२


पैसा

व्यवहारी जीवनाचा
सर्वश्व आहे पैसा
माणसाची किंमत म्हणूनच
मोजतो आहे पैसा

दुसर्‍यावर प्रभुत्व गाजवण्याचा
एक साधन आहे पैसा
माणसांना माणुसकीही
विसरवतो हाच पैसा

अटूत संबंधा मध्येही कधी
दरार हाच करतो
संबंध प्रस्थापित करण्याचाही
एक साधन आहे पैसा

पैश्यासाठी कधी बाप
मुलाला विकतो
तर कधी पैश्यासाठी मुलगा
बापाला विसरतो

मनुष्यामध्ये लालच
निर्माण करतो पैसा
भ्रस्टाचाराचेही कारण
हाच एक पैसा

कधी स्व:ताच्या तालावर
नाचावतो हाच पैसा
कधी मनुष्याच्या तालावर
नाचतो हाच पैसा

पोटासाठी कधी हा
विकवतो देहाला
तर कधी देहासाठी पैसा
विकवतो
पोटाला

पैशाचा जन्मदाता
मनुष्यच आहे
पण बापाचा लग्न लावण्याचा
मान मिरवतोय पैसा

प्रेम मिळवण्यासाठीही आज
पैसा लागतो आहे
हृदय सुद्धा आज
पैशाने मिळतो आहे

गरीबी आणि अमिरी मधला
फरक आहे पैसा
ज्याच्याकडे पैसा त्यालाच
मिळतो आहे पैसा

माणसाची माणुसकी
विकवतो आहे पैसा
रंकांनाही देवपण
मिळऊन देतो पैसा

पैशावरच तर इथे
सार राजकारण चालते
पतीव्रतानाही मग
नन्गे करून सोडते

पैशामुळेच तर काही मुले
बापाला विसरतात
कुणी विचारले असता
नौकराची उपमा देतात

पैशावरूनच तर आज
माणसांची किंमत कळते
पैशाच्या बाजारात
माणसांची बोली लागते

पैशासाठी सर्रास
देहव्यापार चालतो
ज्याच्याकडे पैसा
तोच नवनवीन चाळे करतो

ज्याच्याकडे पैसा
तोच नेता बनतो आहे
गोर-गरिबांचे भवितव्य
पैसाच ठरवतो आहे

पवित्र बंधनात कधीकधी
पैसा आड येतो
पैश्यासाठी माणूस का
हुंडाबली घेतो

पैशाच्या धुंधित जगनार्यांवरही
एक काळ असा येतो
जिकडे-तिकडे पैसा
पण सुख हरवला जातो

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१२


शंभराची नोट...
मालकानं दिलेली शंभराची नोट त्यानं खिशात ठेवली. झटपट काम संपवून तो बाहेर पडला. त्याची पावलं घराच्या दिशेनं ओढीनं वेगात निघाली. आता सण झोकात साजरा करायचे इमले तो मनात बांधू लागला. गेल्या कित्येक दिवसांत घरात काही गोडधोड शिजलेलं नव्हतं. पोरगं किती तरी दिवसापासनं खीर खायला मागतंय. आज पहिलं खिरीचं साहित्य आणायचं. बायकोची चमचमीत खायची इच्छा कित्येक दिवसांपासून आहे; पण जमलंच नव्हतं. आज ती जाम खूष होईल. मालकिणीनं दिलेली चोळी आणि पातळ जरा शिवून घेईल. यातलेच चार पैसे बाजूला ठेवतो म्हणजे आणखी चार दिवस तरी ताटात कसली ना कसली भाजी दिसेल. बटाट्याची रसभाजी खाऊन किती दिवस झाले? बाप रे, आठवतपण नाही. एक लॉटरीचं तिकीट काढू, बघू काय नशीब फळफळलं तर. चार वर्षांपूर्वी दिवाळीत घेतलेला सदराच जरा शिवून घेतो.

वेडे चाळे

 पहिला मुलगा : माझे बाबा एवढे उंच आहेत कि हात वर करून छताला लावतात  दुसरा मुलगा: माझे बाबा तर एवढे उंच आहेत कि हात वर करून विमानाला लावतात .तिसरा मुलगा : माझे बाबा पण खूप उंच आहेत पण ते असले चाळे करत नाहीत..
         ‘तुझ्याशी लग्न करून मी फार मोठी चूक केलीय!’  

           तुझ्याशी लग्न करून मी फार मोठी चूक केलीय!’ तो म्हणाला.
          ‘पण मी काही तुझ्या पाठीमागे लागले नव्हते.’ ती ठसक्यात म्हणाली.
          ‘बरोबर आहे. सापळा कधी उंदराचा पाठलाग करतो का?’ त्यानं विचारलं.