रविवार, २६ फेब्रुवारी, २०१२


पैसा

व्यवहारी जीवनाचा
सर्वश्व आहे पैसा
माणसाची किंमत म्हणूनच
मोजतो आहे पैसा

दुसर्‍यावर प्रभुत्व गाजवण्याचा
एक साधन आहे पैसा
माणसांना माणुसकीही
विसरवतो हाच पैसा

अटूत संबंधा मध्येही कधी
दरार हाच करतो
संबंध प्रस्थापित करण्याचाही
एक साधन आहे पैसा

पैश्यासाठी कधी बाप
मुलाला विकतो
तर कधी पैश्यासाठी मुलगा
बापाला विसरतो

मनुष्यामध्ये लालच
निर्माण करतो पैसा
भ्रस्टाचाराचेही कारण
हाच एक पैसा

कधी स्व:ताच्या तालावर
नाचावतो हाच पैसा
कधी मनुष्याच्या तालावर
नाचतो हाच पैसा

पोटासाठी कधी हा
विकवतो देहाला
तर कधी देहासाठी पैसा
विकवतो
पोटाला

पैशाचा जन्मदाता
मनुष्यच आहे
पण बापाचा लग्न लावण्याचा
मान मिरवतोय पैसा

प्रेम मिळवण्यासाठीही आज
पैसा लागतो आहे
हृदय सुद्धा आज
पैशाने मिळतो आहे

गरीबी आणि अमिरी मधला
फरक आहे पैसा
ज्याच्याकडे पैसा त्यालाच
मिळतो आहे पैसा

माणसाची माणुसकी
विकवतो आहे पैसा
रंकांनाही देवपण
मिळऊन देतो पैसा

पैशावरच तर इथे
सार राजकारण चालते
पतीव्रतानाही मग
नन्गे करून सोडते

पैशामुळेच तर काही मुले
बापाला विसरतात
कुणी विचारले असता
नौकराची उपमा देतात

पैशावरूनच तर आज
माणसांची किंमत कळते
पैशाच्या बाजारात
माणसांची बोली लागते

पैशासाठी सर्रास
देहव्यापार चालतो
ज्याच्याकडे पैसा
तोच नवनवीन चाळे करतो

ज्याच्याकडे पैसा
तोच नेता बनतो आहे
गोर-गरिबांचे भवितव्य
पैसाच ठरवतो आहे

पवित्र बंधनात कधीकधी
पैसा आड येतो
पैश्यासाठी माणूस का
हुंडाबली घेतो

पैशाच्या धुंधित जगनार्यांवरही
एक काळ असा येतो
जिकडे-तिकडे पैसा
पण सुख हरवला जातो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा