शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१२


शंभराची नोट...
मालकानं दिलेली शंभराची नोट त्यानं खिशात ठेवली. झटपट काम संपवून तो बाहेर पडला. त्याची पावलं घराच्या दिशेनं ओढीनं वेगात निघाली. आता सण झोकात साजरा करायचे इमले तो मनात बांधू लागला. गेल्या कित्येक दिवसांत घरात काही गोडधोड शिजलेलं नव्हतं. पोरगं किती तरी दिवसापासनं खीर खायला मागतंय. आज पहिलं खिरीचं साहित्य आणायचं. बायकोची चमचमीत खायची इच्छा कित्येक दिवसांपासून आहे; पण जमलंच नव्हतं. आज ती जाम खूष होईल. मालकिणीनं दिलेली चोळी आणि पातळ जरा शिवून घेईल. यातलेच चार पैसे बाजूला ठेवतो म्हणजे आणखी चार दिवस तरी ताटात कसली ना कसली भाजी दिसेल. बटाट्याची रसभाजी खाऊन किती दिवस झाले? बाप रे, आठवतपण नाही. एक लॉटरीचं तिकीट काढू, बघू काय नशीब फळफळलं तर. चार वर्षांपूर्वी दिवाळीत घेतलेला सदराच जरा शिवून घेतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा